पालकमंत्र्यांच्या हस्ते झाडांच्या स्थलांतरण कार्याचा शुभारंभ


यवतमाळ, दि. 3 : चौपदरीकरण करतांना रस्त्याच्या मध्ये येणारी झाडे न तोडता त्याचे इतर ठिकाणी स्थलांतरण (पुर्नरोपन) करण्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आला.
धामणगाव रस्त्यावरील पोस्ट ऑफिस चौकात या कार्याचा शुभारंभ पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी 70 वर्षे जुने कडूलिंबाचे झाड जेसीबीच्या सहाय्याने मुळासकट काढण्यात येऊन त्याचे स्थलांतरण करण्यात आले. यावेळी  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, उपअभियंता कार्या, शाखा अभियंता दुर्गे आदी उपस्थित होते.

केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत धामणगाव रस्त्यावर 10 किमीचे रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. पोस्ट ऑफिस चौक ते करळगावपर्यंत हे काम होणार आहे. या रस्त्याच्या कामामध्ये येणारी चांगली झाडे सरसकट न तोडता त्याचे इतर ठिकाणी स्थलांतरण केले तर ती झाडे जिवंत राहू शकतात. या उद्देशाने सदर मार्गावरील  पहिल्या टप्प्यात 55 झाडांचे स्थलांतरण (पुर्नरोपन) जांब रस्त्यावरील वनउद्यानात करण्यात येणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी