जिल्ह्यात 24 तासात 155 जण कोरोनामुक्त

 

Ø 172 नव्याने पॉझेटिव्ह तर तिघांचा मृत्यु

यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात गत 24 तासात 155 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर नव्याने जिल्ह्यात 172 जण पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 69 वर्षीय पुरुष, पांढरकवडा शहरातील 75 वर्षीय पुरुष आणि महागाव तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 172 जणांमध्ये 104 पुरुष व 68 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 14 पुरुष व नऊ महिला आणि यवतमाळ तालुक्यातील दोन पुरुष, उमरखेड शहरातील 16 पुरुष व 22 महिला, घाटंजी शहरातील 18 पुरुष व एक महिला, पुसद शहरातील 13 पुरुष व पाच महिला, बाभुळगाव शहरातील एक पुरुष व चार महिला, दारव्हा शहरातील पाच पुरुष व तीन महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील दोन महिला, कळंब शहरातील एक पुरुष व एक महिला, कळंब तालुक्यातील एक पुरुष, महागाव शहरातील सात पुरुष व तीन महिला, महागाव तालुक्यातील दोन पुरुष, नेर शहरातील आठ पुरुष व नऊ महिला, पांढरकवडा शहरातील चार पुरुष व पाच महिला, पांढरकवडा तालुक्यातील एक पुरुष, राळेगाव शहरातील एक पुरुष, वणी शहरातील सात पुरुष व दोन महिला, वणी तालुक्यातील दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 714 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 591 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8094 झाली आहे. यापैकी 6542 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 247 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 286 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 71899 नमुने पाठविले असून यापैकी 70755 प्राप्त तर 1144 अप्राप्त आहेत. तसेच 62661 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी