निवडणूक खर्च व अनियमिततेच्या अनुषंगाने तीन गुन्हे दाखल


यवतमाळ, दि. 15 : यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक खर्च तसेच अनुषंगीक बाबींमधील अनियमिततेच्या अनुषंगाने तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ लेखी परवानगीशिवाय एकनाथ पंजाब तुमकर व अर्चना अरुण खंडाळकर यांनी सभेकरीता आलेल्या लोकांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी खिचडीचे वाटप केल्याने यवतमाळ शहर पोलिस स्टेशन येथे येथे कलम 171 एच, 188 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरा गुन्हा पुसद (शहर) पोलिस स्टेशन येथे भावना गवळी व रवी पांडे यांचे विरुध्द भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 171- एच, 188 नुसार नोंदविण्यात आला आहे. शिवसेना पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडणुकीला चालना देण्याकरीता मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या वाहनात इंधन टाकून देण्याचे प्रलोभन दिल्याचे निदर्शनास आले आहे. आदर्श आचारसंहितेचे हे उल्लंघन असल्यामुळे गुन्हा  नोंदविण्यात आला आहे.
 तिसरा गुन्हा दारव्हा पोलिस स्टेशन येथे कृषी पर्यवेक्षक प्रकाश अभिमान उघडे व कृषी सहाय्यक राजेश प्रेमसिंग राठोड यांचे विरुध्द नोंदविण्यात आला आहे. त्यांनी संबंधीताकडून भ्रष्ट मार्गाने पैसे घेवून अथवा राजकीय दबावाखाली पसार होण्यास मदत केल्याचे स्पष्ट होत असल्याने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, 176 व 34 तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 नुसार प्रकाश उघडे व राजेश राठोड यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती खर्च निरिक्षक विक्रम पगारीया दिली.
००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी