केंद्रीय निरीक्षक शर्मा यांनी घेतला निवडणुकीबाबत आढावा


v सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या सुचना
यवतमाळ, दि. 3 : केंद्रीय निवडणूक निरीक्षक सुधीर कुमार शर्मा यांनी निवडणुकीच्या तयारीबाबत यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातील राळेगाव, दारव्हा, दिग्रस, पुसद येथे भेटी देऊन आढावा घेतला. तसेच ईव्हीएम – व्हीव्हीपॅटची पाहणी केली.
निवडणूक निरीक्षकांनी राळेगाव येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात निवडणूक कार्याचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी झाडगाव येथील मतदान केंद्राला भेट दिली. तिवसा येथे स्टॅटिक सर्व्हेलंन्स पथकाची तपासणी केली असता आढळलेल्या उणिवाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच दारव्हा येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाला भेट देऊन येथे आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण वर्गाला त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलतांना निवडणूक निरीक्षक सुधीर कुमार शर्मा म्हणाले, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांनी मतदान केंद्रावर किमान सुविधांची पुर्तता झाल्याची खात्री करावी. सर्व ईव्हीएम मशीनचे सिलींग योग्यप्रकारे करण्याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांनी दक्षता घ्यावी. यावेळेस प्रथमच सर्व मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. मतदान केल्यावर व्हीव्हीपॅट स्लीपची खात्री करून मतदाराला बाहेर पडण्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर गर्दी व रांग राहण्याची शक्यता आहे.  मतदान केंद्राबाहेर गोंधळ होणार नाही, याची दक्षता संबंधित केंद्राध्यक्ष, झोनल अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी घ्यावी, अशा सुचनाही सुधीर कुमार शर्मा यांनी केल्या. यावेळी त्यांनी दिग्रस येथील उर्दू हायस्कूल या मतदान केंद्राला भेट दिली.
०००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी