निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कलम 144 लागू


v आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना
यवतमाळ, दि. 9 : 14 - यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात 11 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान संपण्याच्या 48 तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद झाला आहे. तसेच जिल्ह्यात कलम 144 लागू झाले आहे. त्यामुळे या कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या तर त्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या आहेत.
जाहीर प्रचार संपल्यानंतर मतदार संघात कोणत्याही पक्षाचे स्टार प्रचारक, मतदार संघाच्या बाहेरील पक्षाचे कार्यकर्ते / व्यक्ती संबंधित मतदारसंघात राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच याबाबत वेळोवेळी तपासणी करावी. मतदार संघाबाहेरील व्यक्ती राहू शकणारी संभाव्य ठिकाणे यात सार्वजनिक सभागृहे, खाजगी हॉल, रेस्ट हाऊस, लॉजींग, हॉटेल्स, मंगल कार्यालये यांचा समावेश आहे. या ठिकाणांची कसून तपासणी करण्याकरीता स्वतंत्र चमुची व्यवस्था करावी. मतदारसंघाच्या भौगोलिक सिमांवर अधिकचे चेकपोस्ट लावून सदर चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
अवैध दारू साठवणुकीवर बंदी असल्याने अवैध दारूसाठे वाहतुकीवर बारकाईने लक्ष देऊन कार्यवाही करावी. ध्वनीक्षेपक व वाहनांवर प्रचाराकरीता बंदी असल्याने असे प्रकार आढळल्यास त्याबाबतची नियमानुसार कार्यवाही करावी. तसेच जिल्ह्यात कलम 144 लागू झाल्याने सदर कलमाचे उल्लंघन झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या तर त्यावर तात्काळ कार्यवाही करावी, अशा सुचना पोलिस अधिक्षक तसेच सर्व संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या आहे.
मतदानाच्या वेळी दोन बॅलेट युनीट : 11 एप्रिल रोजी मतदान होणा-या यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघात एकूण 24 उमेदवार निवडणुकीसाठी  उभे आहेत. नोटा हा पर्याय सुध्दा बॅलेट युनीटवर असतो. नोटा पर्याय पकडून 25 जणांची यादी बॅलेट युनीटवर राहणार आहे. एका बॅलेट युनीटवर 16 उमेदवार याप्रमाणे 25 जणांच्या यादीकरीता दोन बॅलेट युनीट राहणार आहेत.
००००००






Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी