निवडणूक निरीक्षकांनी केली मतदान केंद्राची पाहणी



v क्षेत्रीय अधिका-यांच्या प्रशिक्षणाला उपस्थिती
यवतमाळ, दि. 8 : निवडणूक निरीक्षक (सामान्य) सुधीरकुमार शर्मा यांनी कळंब तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. कळंब तालुक्यातील जि.प. कन्या शाळेतील मतदान केंद्र 106 व 107, चिंतामणी हायस्कूल मधील मतदान केंद्र 108 व 109 आणि उर्दु हायस्कूल येथील मतदान केंद्र 115 व 116 या मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षकांनी भेटी देऊन येथे तयार करण्यात आलेल्या किमान सुविधांची पाहणी केली.
तत्पूर्वी नियोजन सभागृहात आयोजित क्षेत्रीय अधिका-यांच्या प्रशिक्षणाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे तसेच सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस अधिक्षक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), आणि खर्च निरीक्षक यांच्याशी बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी वाशिम जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी त्यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनानुसार पुढील 72 व 48 तासांदरम्यान करायची कामे, पोलिस बंदोबस्त, जिल्ह्याच्या सीमेवरील गस्त व तपासणी, विविध पथकांद्वारे करण्यात येणारी कामे आदींबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी