समूह राष्ट्रगीत गायन : यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

यवतमाळ, दि. 17 ऑगस्ट (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने ‘स्वराज्य महोत्सवांतर्गत आज सकाळी 11 वाजता यवतमाळ जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदे, पोलीस मुख्यालय, सर्व शासकीय कार्यालये, सर्व तहसिल, नगरपरिषद, ग्रामपंचायत, सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, खाजगी आस्थापना यासह विविध ठिकाणी समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या समुह राष्ट्रगीत गायनासाठी नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला, विशेषत: दहा हजार लोकवस्तीच्या ढाणकी नगरपंचायत क्षेत्रात तब्बल सात हजार नागरिकांनी समुह राष्ट्रगीत गायन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे समूह राष्ट्रगीत गायनप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, संगीता राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, जिल्हा सूचना अधिकारी राजेश देवते, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी