कौशल्य विकास विभागातर्फे 19 ते 28 ऑगस्ट दरम्यान

ऑनलाईन रोजगार मेळावा यवतमाळ, दि.18 ऑगस्ट (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांचे वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 19 ते 28 ऑगस्ट 2022 दरम्यान केले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम नोंदवावा. किमान 12 वी पास उमेदवारांना सेवायोजन कार्य चा युझरेनेम व पासवर्ड ने लॉगीन करून या मेळाव्यात सहभागी होता येईल. अधिक माहितीकरिता 07232-244395 या क्रमांकावार संपर्क साधावा असे जिल्हा कौशल्य विकास विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस