तक्रार घेवून येणाऱ्या नागरिकांना समाधानकारक उत्तर द्यावे - जिल्हाधिकारी अमोल येडगे

लोकशाही दिनात 148 तक्रारी प्राप्त यवतमाळ, दि 1 ऑगस्ट (जिमाका) :- लोकशाही दिनात सादर झालेल्या तक्रारींचे अनुपालन कार्यालय प्रमुखांनी तात्काळ करावे व तक्रार घेवून येणाऱ्या नागरिकांना समाधानकारक उत्तर द्यावे तसेच यापुढे एक महिण्यापेक्षा जादा कालावधीपर्यंत तक्रारी प्रलंबित राहील्यास संबंधीत कार्यालय प्रमुखांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लोकशाही दिनात सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे व इतर कार्यालय प्रमुख उपस्थित होते. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज एकूण 148 तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींचा निपटारा पुढील लोकशाही दिनापुर्वी करण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याप्रसंगी विविध विभाग प्रमुख व अधिकारी हजर होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी