मानव विकास कार्यक्रमातून जास्त रोजगार निर्मिती करणारे प्रस्ताव सादर करा Ø तालुका स्पेसिफीक योजना राबविणार Ø प्रत्येक तालुक्याला 2 कोटी निधी Ø मधाचे गाव विकसित करा

यवतमाळ, दि. 10 ऑगस्ट : जिल्ह्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत तालुका स्पेसिफीक योजना राबविण्यासाठी प्रत्येक तालुक्याला 2 कोटी निधी वितरीत करण्यात येणार असून त्यातून उत्पन्नात वाढ करणारे, मुल्यवर्धक व जास्तीत जास्त रोजगार निर्मिती देणारे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. मानव विकास कार्यक्रम योजनेचा आढावा आज जिल्हाधिकारी यांनी घेतला. याप्रसंगी मानव विकासचे जिल्हा नियोजन अधिकारी अ.वि.सुने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, माविमचे रंजन वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते. मानव विकास कार्यक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश असून प्रत्येक तालुक्याला 2 कोटी प्रमाणे एकूण 18 कोटी निधी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. या तालुक्यांसाठी विशेष योजना तयार करतांना महिला बचत गट, लोक संचलित साधन केंद्र, शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती / जमातीचे शेतकरी उत्पादक कंपनी, आदिवासी वन धन केंद्र, जीवनोन्नती अभियानाचे ग्रामसंघ, आत्मा गट, आदिवासी सहकारी संस्था, मच्छिमार सहकारी संस्था व इतर सहकारी संस्था, आदिवासी पेसा भागातील ग्रामसभा तसेच उमेद व माविम व्यतिरिक्त इतर संस्थांनी स्थापन केले महिला बचत गट यांनी देखील योजनेचे लाभार्थी म्हणून विविध प्रस्तावांसोबतचे ड्रोन फवारणी, अन्न प्रक्रीया उद्योग गोट बँक यासारखे नाविण्यपुर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. मधाचे गाव विकसित करा : आग्यामध संकलन केंद्र तयार करण्यासाठी तालुकानिहाय 15 लाख रुपये निधी राखीव ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले असून मध संकलनासाठी प्रशिक्षण व साहित्यही देण्याचे तसेच जिल्हास्तरावर मधप्रक्रीया केंद्र सुरू करून जिल्ह्यात मधाचे गाव विकसित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. बैठकीला कृषी, रेशीम उद्योग, मत्सव्यवसाय, खादी ग्रामोद्योग, शबरी महामंडळ, पेसा, ग्रामपंचायत यासह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी