स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 'जीवन गाणे गातच जावे' सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ, दि ११ ऑगस्ट जिमाका :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैदी बांधवांचे मनोरंजनच्या माध्यमातून प्रबोधन, जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यासाठी देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमित नानेटकर यांच्या चमूने नृत्य व देशभक्तीपर गीत बंदिवानांसमोर सादर केले. या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, कीर्ती राऊत, क्रांती धोटे, स्मिता भोईटे, माया शेर, आकाश घुरट, विक्रांत कोटक, विशाल डहाके,नितीन भुतडा, वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्रीधर काळे, तुरुंगाधिकारी धनंजय हुलगुडे उपस्थित होते. यावेळी बंदी जणांना शुभेच्छा देताना कीर्ती चिंतामणी म्हणाल्या की, आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही. यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. या स्वातंत्र्याची महती, त्याचा इतिहास आपल्याला माहीत व्हावा, त्यातुन आपल्याला प्रेरणा घेता यावी यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बंदी जणांसाठी प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व कारागृहामध्ये आज एकाच दिवशी एकाच वेळी हा कार्यक्रम होत आहे. आज योगायोगाने रक्षाबंधनाचा पवित्र दिवस आहे. आपल्या शहरातील काही भगिनींनी आज आपल्यासाठी वेळ काढून येथे येऊन सर्व बंदी जणांना राखी बांधून बहीण- भावाच्या नात्याचे आत्मिक समाधान दिले आहे. आपण या नात्याचा आदर राखून आपले भविष्य योग्य मार्गाने निश्चित कराल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी बोलताना स्मिता भोईटे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर जवानांना बंदी जणांनी चांगल्या मार्गाचा अवलंब करत चांगले काम करून श्रद्धांजली अर्पण करावी. वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी या शहिदांकडून आपण प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून रक्षाबंधनाच्या आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी कारागृह कर्मचारी आणि बंदीजन मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी