राष्ट्रीय लोकअदालतमध्ये १४ कोटी मुल्याची ७७२१ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली

यवतमाळ दि. 14 ऑगस्ट (जिमाका) : यवतमाळ जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये 13 ऑगस्ट रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 2543 प्रलंबीत व 5178 वादपुर्व अशी एकूण सात हजार 721 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. निकाली निघालेल्या प्रकरणांचे एकुण तडजोड मुल्य रूपये 14 कोटी चार लाख 51 हजार 619 आहे. तसेच विशेष मोहिमेअंतर्गत २०८६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशावरुन 13 ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष अनिल सुब्रमण्यम यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा न्यायालय येथे त्यांचे हस्ते राष्ट्रीय लोकअदालतचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के. ए. नहार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अमित बदनोरे, तसेच जिल्हा न्यायालय यवतमाळचे न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार उपस्थित होते. या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयात प्रलंबीत व वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर वेगवेगळया राष्ट्रीयकृत बँका व विशेष म्हणुन जिल्हा परिषद अंतर्गतचे ग्रामपंचायत कर बाबतची वादपुर्व प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतसमोर ठेवण्यात आली होती. ही प्रकरणे मोठ्या संख्येने आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत न्यायाधीश व विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य व जिल्हा प्रशासनाचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी