शासकीय निवासी शाळेत साप्ताहिक व्याख्यानमाला

यवतमाळ, दि 1 ऑगस्ट (जिमाका) :- दिनांक 26 जुलै 2022 रोजी अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, ईसापूर तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ येथे सामाजिक न्याय विभागाच्या निर्देशानुसार महिण्याच्या प्रत्येक आठवडयात विद्यार्थांना मार्गदर्शन करण्याकरिता साप्ताहिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. दिनांक 26 जुलै 2022 रोजी सदर शाळेत प्रमुख व्याख्याते म्हणुन तहसिलदार प्रविण धानोरकर तसेच नायब तससिलदार तथा मुख्याधिकारी सुधाकर राठोड व पुरवठा निरिक्षक पंकज सदातपुरे व शाळेचे मुख्याध्यापक सोनप्रसाद पढाल यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक सोनप्रसाद पढाल यांनी शाळेच्या परंपरेविषयी माहिती दिली. त्यानंतर पंकज सदातपुरे पुरवठा निरीक्षक दिग्रस यांनी शाळेच्या विद्यार्थांना अभ्यासाविषयी त्यांना शासनाकडुन मिळणाऱ्या सोयी सुविधेविषयी व तसेच स्पर्धापरिक्षेची माहिती सांगीतली त्यानंतर सुधाकर राठोड नायब तहसिलदार तथा मुख्याधिकारी यांनी सुध्दा विद्यार्थांना अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले. तद्नंतर प्रविण धानोरकर, तहसिलदार दिग्रस यांनी विद्यार्थांना विद्यार्थीदशेत असतांना अभ्यासाचा नियोजन कसे करावे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दुर्गा जाधव यांनी केले व उपस्थितांचे आभार सरिता भोयर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शाळेच्या सर्व शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी