प्रकल्पस्तरीय जागतिक आदिवासी गौरव दिन पुसद येथे उत्साहात साजरा

यवतमाळ,दि.18 :-“भारतीय स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव” व “जागतिक आदिवासी गौरव दिन” निमित्त “प्रकल्पस्तरीय जागतिक आदिवासी गौरव दिन” समारंभ दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी पुसद येथील अग्रवाल मंगल कार्यालयात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी विकास विभागाचे माजी आयुक्त संभाजी सरकुंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करुन करण्यात आले, अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे हे होते. कार्यक्रमात आदिवासी सेवक रामकृष्ण, चौधरी,शामरावजी व्यवहारे, नारायण क-हाळे, भगवान डाखोरे, श्रीराम अंभोरे यांच्यासह आदिवासी समाजासाठी गौरवास्पद कार्य केलेल्या व्यक्तींचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच प्रकल्प कार्य क्षेत्रातील अनुदानित आश्रमशाळांचे संस्थाचालक, गुणवंत विद्यार्थी व खेळाडू यांचाही पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संभाजी सरकुंडे यांनी आपल्या भाषणात प्रत्येकाने शिक्षण घेवून स्वत:चा सर्वांगीण विकास करुन घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. तर आत्माराम धाबे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाव्यतीरीक्त गौरवास्पद व्यक्तींचा सत्कार व व्यावसायिक संधीबाबत मार्गदर्शन करून असा व्यापक कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. यावेळी दक्षा बोराळकर, सुरेश धनवे, उत्तमराव इंगळे, डॉ.आरतीताई फुपाटे, विजय मोघे, रामकृष्ण चौधरी या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली. दुपारच्या सत्रामध्ये उद्योग, शेती व वन उत्पादने या विषयाचे मार्गदर्शन उदयोजक व तज्ञ व्यक्तींमार्फत करण्यात आले. यावेळी उद्योजक गोपाल वासनिक व विजय सोमकूंवर, माजी शाखा व्यवस्थापक योगीराज आढावतकर, शबरी महामंडळचे गौरव कांबळे तसेच उमेद यवतमाळ, ट्रायफेड चे प्रतिनीधी यांनी उपस्थितांना माहिती देवून मार्गदर्शन केले व यापूढे प्रकल्प कार्यक्षेत्रात उद्योजकता प्रशिक्षण राबवून वर्षभरात किमान दहा उद्योजक निर्माण करणेबाबत निर्धार व्यक्त केला. यावेळी प्रकल्प कार्यालयाच्या योजनांच्या माहितीचा स्टॉल तसेच महिला बचतगटांचे रानभाज्या, वनौषधी, खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन एन.डी.राऊत, कु.मिर्झा मॅडम, कु.स्नेहा राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार जी. व्ही. खडीकर‍ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह मुख्याध्यापक,गृहपाल, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी