नगरपरिषद निवडणूक आरक्षणाची अंतिम अधिसुचना प्रसिद्ध

यवतमाळ, दि 5 ऑगस्ट : यवतमाळ जिल्‍ह्यातील नगर परिषद यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, उमरखेड, आर्णी, दारव्हा व घाटंजी या नगर परिषदेच्‍या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण दिनांक २८ जुलै २०२२ रोजी सोडत पध्‍दतीने निश्चित करण्‍यात आले आहे. राज्‍य निवडणूक आयोगाचे सुचनेनुसार वरील नगर परिषदांची आरक्षण सोडत दिनांक २९ जुलै २०२२ रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आली. त्‍यानुसार दिनांक ०१ ऑगस्ट २०२२ रोजी पर्यंत महाराष्‍ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम-१९६५ मधिल कलम १० नुसार नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्‍यात आल्‍या होत्‍या. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, अमरावती यांची नगर परिषद यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, उमरखेड, आर्णी, दारव्हा व घाटंजी च्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षणास अंतिम मान्‍यता मिळालेली आहे. नगर परिषद यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, उमरखेड, आर्णी, दारव्हा व घाटंजी च्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षणाची अंतिम अधिसुचना संबंधित नगर परिषद कार्यालयाचे सुचना फलकावर व वेबसाईटवर तसेच जिल्‍हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सुचना फलकावर व yavatmal.gov.in या वेबसाईटवर दिनांक ०५ ऑगस्ट.२०२२ रोजी प्रसिध्‍द करण्‍यात येत आहे, असे जिल्‍हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी