इतर मागासवर्गीय विकास महामंडळाच्या बीज भांडवल योजनेसाठी अर्ज आंमत्रित यवतमाळ, दि 3 ऑगस्ट (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालय यवतमाळ यांचे मार्फत विविध योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराकरीता सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी बीज भांडवल कर्ज योजना 46 भौतिक व 27.42 लक्ष आर्थीक,वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 119 भौतिक व 135.66 लक्ष आर्थीक, गट कर्ज व्याज परतावा योजना 13 भौतिक व 70.85 लक्ष आर्थीक तसेच वैयक्तिक थेट कर्ज योजना 100 भौतिक व 100 लक्ष व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना 11 भौतिक व 16.50 लक्ष आर्थिक आर्थिक उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनांचे उद्देश, स्वरुप व पात्रतेचे निकष याची सविस्तर माहिती करिता महामंडळाच्या वेबसाईट www.msobcfdc.org या वेबसाईटवर अर्ज करावा. तसेच बीज भांडवल व थेट कर्ज योजने बाबत जिल्हा कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दक्षता भवनच्या मागे, दारव्हा रोड, यवतमाळ येथे तसेच दूरध्वनी क्रमांक 07232-243052 यावर संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्या) यवतमाळ यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी