अनधिकृत संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये

यवतमाळ,दि.12 आँगस्ट जिमाका:- शासनाची मान्यता नसलेल्या अनधिकृत संस्था प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना खोटी आमिषे दाखवून अथवा संस्था मान्यता प्राप्त आहे असे भासवून प्रवेश घेण्यास प्रवृत्त करतात व नंतर विद्यार्थ्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे निर्दशनास येते. कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संबंधी प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थी व पालक यांनी महाराष्ट्र शासन यांची मान्यता व महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ यांची सलग्नता नसलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये. अनधिकृत संस्थेच्या भुलथापांना,त्यांच्या खोट्या दाव्यांना व जाहिरातींना बळी न पडता संस्था व अभ्यासक्रमाची मान्यता शासनाच्या वा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://msbsd.edu.in तपासून खात्री करावी व नंतरच प्रवेश घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडाळामार्फत विविध ३६ गटात (sector) कौशल्य व्यवसाय शिक्षण (vocational education) व व्यवसाय प्रशिक्षण (vocational training) संबंधी प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम शासन मान्यता व मंडळाद्वारे संलग्नता प्राप्त शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थामार्फत राबविण्यात येत आहेत. कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अभ्यासक्रम व संस्थांना मंडळ तसेच राज्य व प्रसंगी केंद्र शासनाची मान्यता असणे आवश्यक आहे. मंडळाच्या https://msbsd.edu.in या संकेतस्थळावर सक्षम प्राधिकरणाची मान्यता असलेल्या संस्था व सदर संस्थेत चालविल्या जाणाऱ्या अधिकृत अभ्यासक्रमाची यादी उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च व तंत्र व व्यवसाय शिक्षण यामधील अनधिकृत संस्था स्थापन करण्यास आणि अनधिकृत पाठ्यक्रम सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे. तदानुषंगिक बाबीकरिता तरदूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च,तंत्र व व्यवसाय शिक्षण यामधील अनधिकृत संस्था व अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम प्रतिबंध अधिनियम सन 2013 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 20 लागू करण्यात आला आहे. शासनाची मान्यता नसलेल्या/अनधिकृत संस्था प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांना खोटी आमिषे दाखवून अथवा संस्था मान्यता प्राप्त आहे असे भासवून प्रवेश घेण्यास प्रवृत्त करतात. नंतर विद्यार्थ्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे निर्दशनास येते. कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संबंधी प्रमाणपत्र, पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थी वर्ग व पालक यांनी काळजी घ्यावी. महाराष्ट्र शासन यांची मान्यता व महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ यांची सलग्नता नसलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये. अनअधिकृत संस्थेच्या भुलथापांना,त्यांच्या खोट्या दाव्यांना व जाहिरातींना बळी न पडता संस्था व अभ्यासक्रमाची मान्यता शासनाच्या वा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://msbsd.edu.in तपासून खात्री करावी व नंतरच प्रवेश घ्यावा. अभ्यासक्रमासाठी राज्यातील संस्था व अभ्यासक्रम मान्यतेबाबत व अनधिकृत संस्थांच्या तक्रारीबाबत मंडळ, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अथवा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संचालक महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई येथील. योगेश पाटील यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी