तहसील कार्यालयामार्फत समाधान शिबीर संपन्न • 28 नागरिकांनी केले रक्तदान • 1044 लाभार्थ्यांना विविध दाखल्याचे वितरण • समाजसेवेतील योगदानाबाबत सत्कार

यवतमाळ दि. 2 ऑगस्ट, महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपुर्ण महाराजस्व अभियान योजने अंतर्गत तहसील कार्यालय यवतमाळ यांचे मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व १ ऑगस्ट महसुल दिन यांचे औचित्य साधून काल टिंबर भवन येथे विस्तारीत समाधान शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी आमदार मदन येरावार, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य टिळक यांचे पुण्यतिथी निमित्त प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, त्यामध्ये २८ व्यक्तींनी रक्तदान केले. शिबीरात विविध प्रकारचे दाखल्याचे वितरण करण्यात आले, यामध्ये जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखला, कुटूंब अर्थसहाय्य योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्डचे असे एकूण १०४४ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे प्रेरणेतून एक दिवस बळीराजा सोबत या उपक्रमा अंतर्गत यवतमाळ जिल्हयामध्ये २०१७ पासून ज्या शेतकरी यांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्याग्रस्त ८९ शेतकऱ्यांच्या कुटुंबाला ६६ बॅग सोयाबीन, ९४ बॅग कापूस, १८० बॅग तूर, बियाणे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी भरीव आर्थिक मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने भाई अमन नरसिंघानी, साधुराम वाधवानी, तालुका कृषी साहित्य विक्रेता संघ यवतमाळ यांचे तर्फे प्रदीप ओमनवार व कमल बागडी यांना सन्मानित करण्यात आले. मौजा हिवरी येथील लोकसहभागातून ३ कि.मीटर पांदन रस्ता खुला करून शेतकऱ्यांना जाण्या-येण्या करीता रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या किरण ससनकर , .श्याम चुंगळे, रवी तातू , अभिजित मुरखे, दिगांबर शहारे यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्याचा अम्रुत महोत्सव उपक्रमा अंतर्गत उपविभागीय अधीकारी यवतमाळ यांचे मार्गदर्शनात तहसिल कार्यालय यवतमाळ मधील जी जुनी विहीर ज्यामध्ये कचरा टाकून अडगळीत पडलेली विहिर स्वच्छ व पुर्नजीवित करण्यात आली यासाठी तहसील कार्यालयातील स्थानिक कर्मचारी , अधीकारी तसेच ओम तिवारी यांचे सहभागातून पुनर्जीवीत करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सन २०२१-२२ मध्ये ज्या कर्मचारी – अधिकारी यांनी उत्कृष्ट काम केले त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले सुनंदा राऊत नायब तहसिलदार (संगायो) यवतमाळ, नितीन खरोडे मंडळ अधिकारी अर्जुना, राजेश शिरभाते पुरवठा निरीक्षक, माधुरी नेवारे अव्वल कारकुन, दिपाली गोडे महसुल सहायक,सुजाता मनवर तलाठी वाई, गजानन हातगावकर शिपाई, अक्षय बावणे कोतवाल, मधुसूदन डाखोरे पोलीस पाटील खैरगाव, मोहसीन खान ऑपरेटर यांचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमामध्ये निवडणूकी मध्ये तृतीयपंथी यांचा सहभाग वाढावा म्हणून निवडणूक ओळखपत्र तसेच संजय गांधी योजनेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मदनभाऊ येरावार तसेच प्रमुख पाहुणे मा. अमोल येडगे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल झाल्टे तहसिलदार यवतमाळ व सुत्रसंचालन विद्या चिंचोरे व आभार प्रदर्शन अनिरुद्ध बक्षी उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राजेश चिंचोरे नायब तहसिलदार महसुल, राजेश कहारे नायब तहसिलदार निवडणुक, अजय गौरकार निवासी नायब तहसिलदार, वकीला मस्के नायब तहसिलदार संगायो आणि सर्व कार्यालयीन कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी