हर घर तिरंगा भारताचा राष्ट्रध्वज पोस्ट कार्यालयात उपलब्ध

यवतमाळ दि.३ ऑगस्ट जिमाका :- भारत स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्याला आझादी का अमृत महोत्सव असे नाव देण्यात आले आहे. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत आजपासून टपाल कार्यालयामध्ये राष्ट्रध्वजाची विक्री सुरू करण्यात आली आहे. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सर्व लोकांना आपापल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हर घर तिरंगा मोहिमेत टपाल खातेही महत्वाची भुमिका बजावत आहे. त्यामुळे सर्व नागरीकांनी जवळच्या कोणत्याही पोस्टात जाऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यवतमाळ डाकघर अधिक्षक यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी