मुद्राक शुल्काचे दंडाबाबत सवलत योतना

यवतमाळ, दि 1 ऑगस्ट (जिमाका) :- एप्रिल 2022 पासून सुरू झालेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजना सुरू करण्यात आली आहे. थकीत मुद्रांक शुल्क व शास्ती या संबंधी 31 मार्च 2022 पूर्वी नोंटीस प्राप्त झालेल्या पक्षकारानी अद्याप या योजनेचा फायदा घेतला नसेल तर पक्षकारांनी योजनेचा लाभ घेण्याकरीता तात्काळ जिल्हयाचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा आणि दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी किशोर कुमार मगर यांनी केले आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 31,32 (अ),33,33(अ),46,53(अ)व 53 (अ)अन्वेय मुद्रांक शुल्क शास्तीच्या संदर्भात 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या पक्षकाराकरिता सदर माफी योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ही योजना 1 एप्रिल 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत 8 महिने कार्यान्वित राहाणार आहे. सदर माफी योजना ही मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शस्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहे. 1ऑगस्ट 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास, दंडाच्या रकमेत 50 टक्के सुट मिळेल. योजनेबाबत अधिक माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी