जात वैधता प्रमाणापत्र कार्यशाळा

यवतमाळ दि.३ ऑगस्ट जिमाका :- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताडणी समिती यवतमाळ यांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात सन 2022-23 या वर्षात 12 वी विज्ञान मध्ये प्रवेशित विद्यार्थी हे जात वैधता प्रमाणपत्रापासून वंचीत राहू नये म्हणून प्रत्येक महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. पहिली कार्यशाळा ही महिला महाविद्यालय, व दुसरी कार्यशाळा जगदंबा कनिष्ठ महाविद्यालय,यवतमाळ येथील प्रवेशित विद्यार्थी व विद्यार्थींचे पालक यांच्याकरीता आयोजीत करण्यात आली होती. सदर कार्यशाळेचे अध्यक्षस्थान जिल्हा जात प्रमाणपत्र पडताडणी समिती चे अध्यक्ष डॉ.माधव कुसेकर,संशोधन अधिकारी मंगला मुन व जगदंबा महाविद्यालयचे प्राचार्य शितल वातीले उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे प्रास्तविक मंगला मुन यांनी केले. प्रस्ताविकेमध्ये जात वैधता प्रमाणपत्राचे कार्यप्रणाली व त्याची आवश्यकता का आहे याबाबत माहिती व जात वैधता प्रमाणपत्रचे महत्व पटवुन देण्यात आले. त्यानंतर संगणक प्रणालीवर अर्ज कसा भरावा याची माहिती पी.पी.टी. व्दारे समितील कर्मचारी गौरव गावंडे यांनी दिली. तसेच डॉ.माधव कुसेकर यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना जात वैधता प्रामणपत्र करीता सर्व विद्यार्थांनी अर्ज कसे करावे व प्रवेशाच्या पुर्वी आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे,असे आवाहन केले.तसेच उपस्थित विद्यार्थी व पालक यांच्या शंकेचे निराकण करण्यात आले.यानंतर ही जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्या प्रक्रियेदरम्यान कही अडचण असल्यास प्रत्यक्ष भेट देवून आपल्या शंकेचे निराकरण समिती सदस्याकडून करून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.सदर कार्यशाळेचे आभारप्रर्शन विजय महल्ले यांनी केले. सदर कार्यशाळा यशस्वी होण्याकरीता डॉ.शितल वातीले,प्राचर्य जगदंबा कनिष्ठ महाविद्यालय, प्रा.संजय हजारे, प्रा.डॉ.संतोष बोरकर व लिपीक जया खांडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी