यवतमाळ नगर परिषदेला व्यापारी संकुलासाठी जागा देण्याच्या कार्यवाहीला गती द्या - मुख्यमंत्री


यवतमाळ दि. 8 : यवतमाळ नगरपरिषदेला व्यापारी संकुलसाठी टी.बी. हॉस्पिटल जवळची जागा देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
यवतमाळ नगर परिषदेला टी.बी. हॉस्पिटलजवळी जागा महसूल विभागाकडून व्यापारी केंद्रासाठी देण्यासंदर्भात आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी यवतमाळचे पालकमंत्री तथा सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, नगर परिषद संचालनालयाचे संचालक एम. संकरनारायणन, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री मदन येरावार यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नगर परिषदेला महसूल विभागाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगर विकास विभागाने ही जागा नगर परिषदेच्या ताब्यात देण्याची कार्यवाही करावी. तसेच नगर परिषदेकडून सविस्तर प्रस्ताव आल्यानंतर व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी मंजुरी देण्याची कार्यवाही करावी.
पालकमंत्री मदन येरावार म्हणाले की, नगर परिषदेने जागा ताब्यात घेऊन इमारत बांधकामासाठी निविदा प्रक्रियेसंबंधीचा प्रस्ताव येत्या आठ दिवसात नगर विकास विभागाकडे द्यावा.
0000०००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी