जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


यवतमाळ, दि. 3 :  सामाजिक  क्रांतीच्या  प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदींनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी (महसूल) अनुप खांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी. भराडी, उपजिल्हाधिकारी सविता चौधर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सावित्रीबाईंचे योगदान अमुल्य आहे. घर, समाज, कार्यालये आदी ठिकाणी महिलेचा सन्मान झाला पाहिजे. तसेच महिलेला पुढे जाण्यासाठी पाठिंबा मिळणे आवश्यक असून समाजाने महिलांना योग्य प्रोत्साहन व प्रेरीत करणे आवश्यक आहे. सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या शैक्षाणिक व सामाजिक कार्याची दखल प्रत्येकाने घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. यावेळी सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सायली देवस्थळी यांचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुरवठा विभागातील छाया घुगाणे यांनीसुध्दा यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन भारती झाडे यांनी केले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी