बरबडा येथे आरोग्य तपासणी शिबिर



v महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचा उपक्रम
यवतमाळ, दि. 6 : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने चौधरा ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या बरबडा येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी गावातील 644 रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा,            गटविकास अधिकारी अमित राठोड, अकोला बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बेग, गावचे सरपंच मोहन पवार, उपसरपंच वैशाली मेश्राम, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानच्या जिल्हा समन्वयक अर्चना हिवराळे आदी उपस्थित होते.
आरोग्य शिबिरात गावातील रुग्ण, गरोदर माता, स्तनदा माता, अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थी आणि गावातील लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले. यात सिकलसेल, रक्तदाब, रक्तगट, कुष्ठरोग तपासणी, डोळ्यांची तपासणी, क्षयरोग, एचआयव्ही तपासणी आदींचा समावेश होता. यावेळी गावातील एकूण 644 नागरिकांनी आरोग्याची तपासणी केली.
मार्गदर्शन करतांना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा म्हणाले, गावात महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन अभियान चांगल्या प्रकारे राबविले जात आहे. यासाठी मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक गावक-यांना मदत करत आहे. आरोग्याच्या बाबतीत सर्व नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे गावक-यांनी नियमित वैद्यकीय तपासणी करावी. तसेच आपल्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. जेणेकरून रोगांची उत्पत्ती होणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी गरोदर व स्तनदा माता यांना फोलिक ॲसीड, कॅल्शीअम व लोहच्या गोळ्या तसेच शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थी आणि गावक-यांना आवश्यक औषधांचे वाटप  करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक दिनेश खडसे यांनी केले. संचालन जे.ए. तिजारे यांनी तर आभार सहाय्यक मुख्याध्यापक प्रफुल्ल पुंडकर यांनी मानले. यावेळी ग्रामसेवक बनसोड, कृषी सहाय्यक चव्हाण, तलाठी पांडे, आरोग्य सेवक हांडे, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक प्रतीक हेडवू ,मंगेश सोनवणे,कांचन ठाकरे, रविकिरण सूर्यवंशी, कृषी संजीवनी प्रकल्पाचे समुह सहायक देशमुख, प्रतीक्षा दसवनते, मुख्याध्यापक मेश्राम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी