लोकराज्यच्या विशेषंकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन



यवतमाळ दि.12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित झालेल्या सप्टेंबर महिन्याच्या ‘सामर्थ्य शिक्षणाचे समृध्द महाराष्ट्राचे’ या विशेषंकाचे विमोचन जिल्हाधिकारी  डॉ.राजेश देशमुख यांच्याहस्ते मत्स्यव्यवसाय कार्यशाळेदरम्यान करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मत्स्यव्यवसाय विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय शिकरे, सहायक आयुक्त सुखदेवे, केमचे प्रकल्प संचालक देवानंद खांदवे, टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी नंदकिशोर इंगोले, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.
लोकराज्यचे या विशेषंकात राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेली राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्‌यवृत्ती योजना, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना, डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह योजना व वसतीगृह योजना, शेतीपुरक कौशल्य प्रशिक्षण, अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांसह इतर योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
या योजनांवर आधारीत यशकथांचा समावेशही या अंकात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सदर अंक अत्यंत उपयुक्त असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमला सचिन गजभिये, गजानन डहाके, जयप्रकाश बानाईत, नरेंद्र गावंडे यांच्यासह आदी उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी