विभागीय आयुक्तांची शेततळ्यामधील मत्स्यउत्पादन नर्सरीला भेट



यवतमाळ, दि. 28 : कृषी समृध्दी प्रकल्प (केम) आणि टाटा ट्रस्टच्या यांच्या माध्यमातून मनपूर (ता.यवतमाळ) येथे विकसीत करण्यात आलेल्या शेततळ्यामधील मत्स्यउत्पादन नर्सरीला विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपविभागीय  अधिकारी स्वप्निल तांगडे, केमचे जिल्हा व्यवस्थापक देवानंद खांदवे आदी उपस्थित होते.
            मनपूर येथील नर्सरीची पाहणी करतांना विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले, शेततळ्यांमध्ये मत्स्यउत्पादन हा अतिशय अभिनव उपक्रम यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात साडेसहा हजारांच्या वर शेततळे निर्माण केले आहेत. यापैकी जवळपास एक हजार शेततळ्यांमध्ये मत्स्य्उत्पानदाचे नियोजन आहे. शेतक-यांनी याचा फायदा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.  तसेच बोटुकली तयार झाल्यावर कुठे देणार, यासाठी शेतक-यांना प्रत्येक बोटुकलीमागे किती पैसे दिले जाते, याची विचारणा विभागीय आयुक्तांनी केली.
            तर केम आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त माध्यमातून जिल्ह्यातील एक हजार शेततळ्यांमध्ये मत्स्यउत्पादनासाठी 200 नर्सरी तयार करण्यात आल्या आहेत. शेततळ्यांमधून जितकी बोटुकली निघेल त्याप्रमाणे पैसे देण्यात येतात. पाण्याची अतिरिक्त सोय असेल अशा ठिकाणी जास्त बोटुकली देण्यात येतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली.  यावेळी केमचे अधिकारी तसेच टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी, शेतकरी आदी उपस्थित होते.
            तत्पूर्वी विभागीय आयुक्तांनी किन्ही येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि मनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी