योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक


 यवतमाळ, दि. 24 : केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, जिल्हा कामगार अधिकारी श्री. धुर्वे आदी उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत दीड लक्षाच्या वर नागरिकांना उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मात्र अजूनही काही लाभार्थी या योजनेपासून वंचित आहे. उज्वला गॅस योजनेचा एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये. गॅस एजन्सीने पात्र लाभार्थ्यांना त्वरीत गॅस कनेक्शन द्यावे. त्यासाठी पुरवठा विभागाने पात्र लाभार्थ्यांची यादी गॅस एजन्सीधारकांना उपलब्ध करून द्यावी. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांनीसुध्दा दहा दिवसांत सर्व अर्ज प्रत्येक एजंन्सीला देणे आवश्यक आहे. वनश्री योजनेत असणा-या गावांची यादी वनविभागाने उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून वनांवर आधारीत असणा-या लाभार्थ्यांना उज्वलाचे गॅस कनेक्शन देता येतील.
            पंतप्रधान आवास योजनेबाबत पालकमंत्री म्हणाले, अतिक्रमणधारकांना घराचे पट्टे त्वरीत द्या. त्यानुसार त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळेल. तसेच जमीन विकत घेण्यासाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत 50 हजारांचे अर्थसहाय्य करण्यात येते. अटल विश्वकर्मा कामगार नोंदणी अभियानांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात 60 हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. यापैकी 55 हजार कामगारांना विभागाच्या वतीने ओळखपत्र देण्यात आले असून उर्वरीत पाच हजार कामगारांना त्वरीत ओळखपत्र द्यावे, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.
यावेळी पालकमंत्र्यांनी उज्वला गॅस, पीक विमा, पंतप्रधान ग्रामीण आवास योजना, अटल विश्वकर्मा कामगार नोंदणी अभियान, महावितरणच्या सौभाग्य आणि दिनदयाल उपाध्याय योजना आदींचा आढावा घेतला.
००००००

Comments

  1. आमचा जामनकर नगर प्रभाग 21हा परिसर सुध्दा अतिक्रमण मध्ये आहे म्हणुन लवकर कायमस्वरूपी त्वरित द्यावे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी