ई-फेरफार प्रमाणीकरण राज्यात पहिल्या 20 मध्ये यवतमाळचे 13 तालुके


यवतमाळ दि.06 : नागरिकांना गतिमान व पारदर्शक प्रशासन देण्यासाठी केंद्र शासनाने ‘डिजीटल इंडिया’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. राज्यातही या प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. त्यातच राज्य शासनाने ‘ई-डिस्ट्रीक्ट’ प्रकल्पांतर्गत सातबारा संगणकीकरण, ई-फेरफार, दस्तऐवजांचे डिजीटायझेशन आदींवर भर दिला आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्याने यात बाजी मारली असून ई-फेरफार प्रमाणीकरणामध्ये राज्यातील पहिल्या 20 तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 13 तालुक्यांचा समावेश आहे.
शेतक-यांचे शेतजमिनीचे दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी व त्यांना आपली कागदपत्रे कोणत्याही सेतू केंद्रातून तातडीने उपलब्ध व्हावे, यासाठी ई-फेरफार व सातबारा उता-याचे नोंदणी प्रमाणीकरण केले जात आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील खातेदारास विहित कालावधीत फेरफार उपलब्ध करून देण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या वतीने तत्परतेने व नियोजनपध्दतीने सुरू आहे. त्यामुळेच फेरफार प्रमाणीकरणाच्या कामामध्ये जिल्ह्यातील 16 तालुक्यांपैकी 13 तालुके राज्यात पहिल्या 20 मध्ये समाविष्ठ झाले आहेत. यात झरीजामणी, दिग्रस, उमरखेड, केळापूर, कळंब, यवतमाळ, पुसद, वणी, आर्णी, मारेगाव, नेर, राळेगाव आणि महागाव या तालुक्यांचा समावेश आहे. वैशिष्ट्य म्हणजे या यादीत पहिल्या सहा क्रमांकावर यवतमाळ जिल्ह्यातील तालुके आहेत.
राज्यातील एका जिल्ह्याच्या 16 तालुक्यांपैकी 13 तालुके या यादीमध्ये समाविष्ठ असल्याचे हे एकमेव उदाहरण आहे. या माध्यमातून एकूण 1 लक्ष 7 हजार 584 फेरफार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक खातेदारास आवश्यक 7/12, फेरफार व 8-अ हे 100 टक्के त्रृटीरहित व विहित कालावधीत उपलब्ध करून देणे, सर्व शेतक-यांना अद्ययावत पीक पेरेपत्रक तातडीने उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. कायदेशीर बाबीकरीता तलाठ्याच्या स्वाक्षरीशिवाय डिजीटल सातबारा वापरण्यात येतो. या अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 2 लक्ष 58 हजार 584 डिजीटल सातबा-याचे काम पूर्ण झाले असून डिजीटल स्वाक्षरीकृत सातबारा नागरिकांकरीता http://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ई-फेरफार अंतर्गत प्रमाणीकरणाच्या कामामध्ये राज्यातील पहिल्या 20 तालुक्यांमध्ये 13 तालुके यवतमाळ जिल्ह्यातील असून या 13 तालुक्यांची फेरफार प्रमाणीकरणाची टक्केवारी 98 आहे. या कामात सातत्य ठेवण्याचे काम जिल्हा प्रशासन, महसूल विभागाचे प्रयत्न आहे.

राज्यातील पहिले 20 तालुके
अ.क्र.
जिल्हा
तालुका
एकूण भरलेल्या नोंदी
एकूण प्रमाणीकरणासाठी उपलब्ध नोंदी
एकूण प्रमाणीत नोंदी
टक्केवारी
1
यवतमाळ
झरीजामणी
2857
2313
2309
99.83
2
यवतमाळ
दिग्रस
8561
6391
6376
99.77
3
यवतमाळ
उमरखेड
10635
9524
9466
99.39
4
यवतमाळ
केळापूर
4590
3936
3908
99.29
5
यवतमाळ
कळंब
3669
2800
2771
98.96
6
यवतमाळ
यवतमाळ
16930
14345
14184
98.88
7
औरंगाबाद
फुल्लंब्री
19539
17139
16944
98.86
8
यवतमाळ
पुसद
15335
13475
  13321
98.86
9
लातूर
शिरुरअनंतपूर
5500
4869
4812
98.83
10
औरंगाबाद
कन्नड
32188
26731
26408
98.79
11
यवतमाळ
वणी
13881
12553
12395
98.74
12
यवतमाळ
आर्णी
7830
7065
6967
98.61
13
यवतमाळ
मारेगाव
6122
5471
5394
98.59
14
नांदेड
कंधार
10352
9410
9270
98.51
15
नांदेड
हिमायतनगर
6968
6413
6299
98.22
16
यवतमाळ
नेर
7065
5882
5775
98.80
17
परभणी
पाथरी
4585
3019
2964
98.80
18
यवतमाळ
राळेगाव
5124
4455
4373
98.16
19
लातूर
औसा
22744
20074
19696
98.12
20
यवतमाळ
महागाव
6233
5601
5492
98.05

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी