विभागीय आयुक्तांनी घेतली लाभार्थ्यांची भेट


यवतमाळ, दि. 29 : टाटा ट्रस्टच्या यांच्या माध्यमातून मनपूर (ता.यवतमाळ) येथे राबविण्यात येत असलेल्या विदर्भ मनोसामाजिक आधार व काळजी कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्तांनी मानसिक रोगी असलेल्या लाभार्थ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, केमचे जिल्हा व्यवस्थापक देवानंद खांदवे, टाटा ट्रस्ट चे मानसिक आरोग्य तज्ञ प्रफुल कापसे, प्रणव पाटील आदी उपस्थित होते.
        मनपूर येथील टाटा ट्रस्टच्या माध्यमातून तणावग्रस्त शेतकरी व मानसिक रोगी व्यक्तीसाठी एप्रिल २०१६ पासून विदर्भ मनोसामाजिक आधार व काळजी कार्यक्रम यवतमाळ व घाटंजी मधील एकूण ६४ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तणावग्रस्त शेतकरी वा मानसिक रोगीची ओळख करुण त्यांना समुपदेशन व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच गावांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणे, गाव पातळीवर मानसिक आरोग्यासंदर्भात काम करण्यासाठी स्वयंसेवक व आरोग्यसेवक यांचे प्रशिक्षण घेणे तसेच समुपदेशन व उपचारातून बरे झालेल्या रुग्णांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करुण देणे हा आहे.
सदरील कार्यक्रमांतर्गत मनपूर गावांमधील बरे झालेल्या मानसिक रुग्णांशी विभागीय आयुक्त पियुष सिंह व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चर्चा केली. तसेच विदर्भ मनोसामाजिक आधार व काळजी कार्यक्रमाबद्दल माहिती घेऊन सदरील कार्यक्रमाची प्रशंसा केली. इतर गावांमध्ये अशा कार्यक्रमाचा विस्तार करण्याची गरज आहे, त्याबद्दलचे नियोजन व प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यावेळी केमचे अधिकारी तसेच टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी, समुपदेशक अंकुश मांगळे व लाभार्थी शेतकरी आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी