जेसीबी, पोकलँड मशीनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण




v नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून खरेदी
यवतमाळ, दि. 18 : शेतक-यांच्या उत्पन्नात होण्यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, पांदण रस्ते आदी योजना अत्यंत महत्वाच्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली आहे. आगामी काळात या योजना अधिक गतीमान पध्दतीने करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नाविण्यपूर्ण योजनेतून जेसीबी मशीन, पोकलँड आदींची खरेदी केली आहे. या मशीनचे लोकार्पण पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, तहसीलदार शैलेश काळे, जलसंपदा यांत्रिकीकरण विभागाचे अधिक्षक अभियंता आर.एस. चव्हाण आदी उपस्थित होते.
नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाने तीन जेसीबी, चार पोकलँड मशीन, आठ टिप्पर, एक पिकअप व्हॅन आणि एक कन्व्हेंशन ट्रक अशी एकूण 4 कोटी 93 लाख रुपयांची यंत्रसामग्री खरेदी केली आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत नाला खोलीकरण व सरळीकरण करणे, लघु व मध्यम प्रकल्पांचे व शेततळ्यांमधी गाळ काढणे, मातीकामासाठी मशीन वापरणे, जिल्ह्यात भाग-ब अंतर्गत पांदणरस्ते अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे, खडीकरण करणे आदी कामे या मशीनच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. यासाठी डिझेलचा खर्च प्राप्त निधीतून करण्यात येणार आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी