राष्ट्रीय लोकअदालत ३० एप्रिलला

यवतमाळ,दि. २४ एप्रिल (जिमाका):- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,यवतमाळ व जिल्हा वकील संघ,यांचे संयुक्त विद्यमाने ३० एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता जिल्हा न्यायालय,यवतमाळ येथे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, बॅका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुलीप्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येतात. सदर लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरिता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजीक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांस मदत करेल. तसेच लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. तरी सर्व पक्षकारांनी ३० एप्रिल रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील इतर तालुका न्यायालयांत संपर्क साधुन जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन एस.व्ही.हांडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ आणि संजय टि.जैन अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, यवतमाळ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी