वातावरणातील बदलाबाबत वैद्यकिय अधिका-यांची कार्यशाळा

यवतमाळ, दि ५ एप्रिल :- वातावरणातील बदलाबाबत (climate change) जागृती निर्माण करणे. आरोग्य संस्था वातावरणातील बदलासाठी अधिक सक्षम करणे, त्यासाठी आवश्यक ती तयारी आणि मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणुन आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय अधिका-यांसाठी कार्यशाळेचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृह, यवतमाळ येथे करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालयचे सहयोगी प्राध्यपक डॉ सचिन दिवेकर व डॉ विजय डोंपले यांनी पॉवर पॉईंटद्वारे सदारीकरण केले. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पी. एस. चव्हाण व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आर. डी. राठोड यांनी मार्गदर्शन केले. वातावरणातील बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर तसेच विविध आजारांच्या प्रमाणावर होतो, हे आता सर्वज्ञात झाले आहे. या विषयाचे महत्व लक्षात घेऊनच २०२०-२०२१ पासून राष्ट्रीय वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रम आरोग्य अभियानांमध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. वातावरणातील बदलाला संवेदनशील असणा-या आजारांना समर्थपणे तोंड देता यावे यासाठी सर्व नागरिकांसाठी आणि विशेषतः लहानमुले, स्त्रिया, वृध्द, आदिवासी आणि परिघावरील जनसमूहासाठी आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येत आहे. उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका संभवत असल्याने तत्काळ उपचारासाठी जिल्ह्यातील ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहे. चक्कर येणे सुस्त वाटणे, त्वचा लालसर होणे, मळमळ, उलट्या होणे, हृदयाचे ठोके वाढणे आदी उष्माघाताचे लक्षणे आहे. नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी, सरबत प्यावे, सैल कपडे घालावे,उन्हात जाताना रुमाल,टोपी, छत्रीचा वापर करावा. या कार्यशाळेला मधूकर मडावी, डॉ शाहु, डॉ स्मिता पेटकर, डॉ निलेश लीचडे, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी