कौशल्य विकास विभागातर्फे ४२३ जागांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

यवतमाळ दि. २४ एप्रिल ,(जिमाका):-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेमार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा २४ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान होणार आहे. स्थानिक पातळीवर तसेच बाहेरील ठिकाणी औद्योगिक संस्थांना मनुष्यबळाची मागणी या कार्यालयाकडे नोंदविण्यात आलेली आहे. सदर मागणीच्या अनुसरुन जिल्ह्यातील तसेच इतर ठिकाणच्या कंपनीशी संपर्क साधून वैभव एन्टरप्रायजेस नागपूर, भुमी विकास इंडस्ट्रिज प्रा.लि.पुसद, पिपल ट्रि व्हेन्चर प्रा.लि.औरंगाबाद, टॅलेनसेतू प्रा.लि. पूणे या कंपनी मार्फत एकूण ४२३ रिक्त पदांकरिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. सदर मेळाव्यामध्ये किमान १२ वी.उत्तीर्ण झालेले इंजिनियरींग पदवी, पदविका, नर्सिंग पदवी, पदविका धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना त्यांच्याकडील सेवा योजना कार्डचा (एम्प्लॉयमेंट कार्ड) युजरनेम व पासवर्ड लॉगिन करून सदर मेळाव्यामध्ये सहभागी होता येईल. सदर ऑनलाईन मेळाव्याकरिता उमेदवारांकडे सेवायोजन कार्ड (एम्प्लॉयमेंट कार्ड)चा युझरनेम व पासवर्ड असणे आवश्यक आहे. नसल्यास rojgar.mahaswayam.gov.in य वेबपोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने कार्ड ची नोंदणी करता येईल. तसेच जॉब सिकर या टॅबमध्ये लॉगिनकरून डाव्या बाजूला पं.दिनदयाल उपाध्याय जॉब फेयर या वर क्लिक करून यवतमाळ जिल्हा निवडून दि.२४ एप्रिल ते २८ एप्रिल,२०२३ पर्यंत रोजगार मेळाव्यामध्ये नोंदणीकृत केलेल्या रिक्त पदाच्या पसंतीक्रमानुसार सहभागी होता येणार आहे. सदर मेळाव्यास उद्योजकाकडून ऑनलाइन पद्धतीने मुलाखती,उमेदवाराशी प्रत्यक्ष संपर्क साधून रिक्त पदाकरिता निवड करण्यात येणार आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा. तसेच मेळाव्याच्या अधिक माहितीकरिता ०७२३२-२४४३९५ याकार्यालयीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी