सामाजिक न्यायपर्व अंतर्गत कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा
यबतमाळ, दि 25 एप्रिल :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागव्दारे "सामाजिक न्यायपर्व" व "शासकीय योजनांची जत्रा” या उपक्रमाअंतर्गत सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कार्यालयीन कर्मचारी, शासकीय निवासी शाळेतील कर्मचारी, गृहपाल व सर्व कर्मचारी, सर्व मागासवर्गीय महामंडळातील अधिकारी /कर्मचारी यांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक तुषार नांदुरकर यांनी केले. भाऊराव चव्हाण, यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना अभ्यांगतासोबत कसे बोलावे व बोलताना नम्रपणे मार्गदर्शन कसे करावे, पत्रव्यवहार शासकीय नियमानुसारच करावा, सर्व कर्मचा-यांनी राजशिष्टाचाराचे पालन करावे, टिपणी कशी लिहावी, अभिलेख अदयावती करण व जतन, शासकीय रजांबाबत मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन अमित कापसे यांनी केले.
Comments
Post a Comment