जिल्हा कारागृहात कैद्यांच्या अधिकारावर शिबिर

यवतमाळ,दि.२५ एप्रिल (जिमाका) राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा कारागृह यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने कैद्यांच्या अधिकाराविषयी 'प्ली बारगेनिंग' या विषयावर जिल्हा कारागृह,यवतमाळ येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराच्या अध्यक्षस्थानी सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कुणाल नहार,उपमुख्य विधीसहाय संरक्षण सल्लागार हर्षवर्धन देशमुख,सहाय्यक विधी सहाय संरक्षण सल्लागार पुष्पा जैन तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी अधीक्षक जिल्हा कारागृह एस.पी.काळे,अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश रेणुका मोरे, दिवाणी न्यायाधीश अजय दाणी तसेच सहाय्यक विधी सहाय्य संरक्षण सल्लागार अश्विन ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कुणाल नहार यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची व कार्याची माहिती उपस्थित कैद्यांना दिली.यामध्ये आरोपी करिता मोफत वकिलाची नेमणूक करण्यात येते.आरोपीस पॅनल वकिलांना कोणतीही फी.द्यावी लागत नाही.जिल्हा कारागृहांमध्ये मोफत सल्ला व मार्गदर्शन करिता पॅनल वकील तसेच पॅरा विधी स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.त्यांच्याकडून योग्य तो सल्ला आपणास मोफत मिळू शकतो याबाबत त्यांनी कैद्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हर्षवर्धन देशमुख यांनी कारागृहात असलेल्या कैद्यांना न्यायालयात आपली बाजू मांडण्याकरिता मोफत वकील मिळणार असल्याचे यावेळी सांगितले.तसेच कैद्यांचे अधिकार व प्ली बारगेनिंग बाबत विस्तृत अशी माहिती सोप्या भाषेत कैद्यांना सांगितली. सहायक विधी सहाय संरक्षण सल्लागार पुष्पा जैन यांनी कैद्यांसाठी कायदेशीर जागरूकता आणि कायदेशीर सेवांसाठी त्यांचे हक्कासंदर्भात कैद्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय दानी यांनी केले तर आभार एस.पी.काळे यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा कारागृह यवतमाळ येथील कैदी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी