नगरपरिषद, नगरपंचायतमधील अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षासूची जाहीर हरकती घेण्यास ८ मे पर्यंत मुदत
यवतमाळ, दि. 3 मे (जिमाका):- यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद , नगरपंचायत मधील गट क व गट-ड संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची १ जानेवारी २०२३ या दिनांकावर आधारित सन २०२२ या वर्षातील पात्र उमेदवारांची सामाईक प्रारूप प्रतीक्षासूची जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सूचना फलकावर, yavatmal.nic.in या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद /नगरपंचायत कार्यालयाचे सूचना फलकावर आज ३ मे रोजी प्रसिध्दी करण्यात आलेली आहे.
सदर गट-क व गट-ड संवर्गातील १ जानेवारी २०२२ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीमधील पात्र अनुकंपा उमेदवारांच्या सामाईक प्रारूप प्रतीक्षा सूचीवर ज्या अनुकंपा धारकांना काही हरकती व सूचना दाखल करावयाच्या असतील, त्यांनी संबंधित नगरपरिषद /नगरपंचायत यांच्या मुख्याधिकारी यांचेकडेच संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत कार्यालय येथे दिनांक ३ मे (बुधवार) ते दिनांक ८ मे २०२३ (सोमवार) रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत पुराव्यासहीत लेखी स्वरुपात सादर कराव्यात. त्यानंतर येणाऱ्या हरकती व सूचना विचारात घेण्यात येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे लेखी हरकती व सूचना संबंधित नगरपरिषद /नगरपंचायत यांच्या मुख्याधिकारी यांचेकडेच नगरपरिषद/ नगरपंचायत कार्यालय येथे प्राप्त होतील, त्यावर ९ मे २०२३ (बुधवार) रोजी सकाळी ११ वाजता पासून जिल्हा सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ हे सुनावणी देतील, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.
Comments
Post a Comment