तालुकास्तरावर स्त्रीशक्ती समाधान शिबीराचे ३० मे पर्यंत आयोजन

यवतमाळ, दि. २५ मे (जिमाका):- समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व त्यांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपयोजना म्हणून तालुकास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबीर तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली होणार असून याशिबिरासाठी सर्व शासकीय यंत्रणांचे प्रमुखांची उपस्थिती राहणार आहे. त्याअनुषंगाने,आर्णी, दिग्रस, कळंब ,वणी व झरी जामणी येथे ३० मे रोजी, बाभूळगाव, घाटंजी, राळेगाव व नेर येथे २९ मे, मारेगाव , महागाव, उमरखेड येथे २६ मे याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात यांनी दिली. या शिबिरास संबंधित तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती राहणार असून पिडीत महिलांच्या समस्यांचे निराकरण जागेवरच करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. समस्याग्रस्त पीडित महिलांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करून घेण्याकरिता आपापल्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेशी संपर्कसाधून शिबिराच्या एक दिवस अगोदर आपली समस्या विहित अर्जाद्वारे दाखल करावी.जेणेकरून शासकीय यंत्रणेकडून निवारण करण्यासाठी सोयीचे होईल. सदर शिबिरामध्ये अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी