शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.23 मे.(जिमाका):-शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यवतमाळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनेकरीता इच्छुकांकडुन प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहे. या कर्ज योजनेत महामंडळाचा ९५ टक्के सहभाग तर लाभार्थ्यांचा ५ टक्के सहभाग राहणार आहे. या योजनेसाठी विहीत नमुन्यातील अर्ज महामंडळाच्या कार्यालयात उपलब्ध असुन संपुर्ण कागदपत्रासह ३० मे २०२३ पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या कर्ज योजनेतून महिला सशक्तीकरण (२ लक्ष रूपये) लक्षांक ११, बचत गट योजना (०५ लक्ष रूपये) लक्षांक १, कृषी आणी संलग्न व्यवसाय (२ लक्ष रूपये) लक्षांक १५, होटेल ढाबा व्यवसाय (५ लक्ष रूपये) लक्षांक ३, स्पेअर पार्ट/ऑ़टो वर्क शॉप (५ लक्ष रूपये) लक्षांक ३ , वाहन व्यवसाय (१० लक्ष रूपये) लक्षांक १, लघु उद्योग व्यवसाय (३ लक्ष रूपये) लक्षांक २ प्राप्त झाला आहे. सदर कर्ज योजनेसाठी व्यवसायाचे प्रस्ताव सादर करतांना जातीचा दाखला,शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.),उत्पनाचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र, आदिवासी विभागात नाव नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र,अनुभव प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, रेशन कार्ड, व्यवसायाचे कोटेशन,ड्रायव्हींग लायसंस, लाभार्थी व २ जामीनदाराचा ७/१२ किंवा घराचा ८ अ.नमुना,२ फोटो, बँकेचे निलचे दाखले व ग्रामपंच्यायत/नगर परीषद यांचे नाहरकत प्रमाणपत्रासह कागदपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०७२३२ -२५३१६९ या क्रमांकावर माहिती घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी