आदिवासींना विविध व्यवसायासाठी अनुदान लाभार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.३ मे.(जिमाका):- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असलेल्या आदिम जमातींचे कोलाम लाभार्थ्यांसाठी न्युक्लिअस बजेट अंतर्गत विविध योजनेसाठी लाभार्थ्याकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे. कुकुटपालन व्यवसाय : आदिम जमाती (कोलाम) १०० टक्के, सर्वसाधारण ८५ टक्के अनुदान लक्षांक ५०. व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य : आदिम जमाती (कोलाम) १०० टक्के अनुदान लक्षांक ५० तसेच सर्वसाधारण ८५ टक्के अनुदान, लक्षांक १५. शिलाई मशिनसाठी अर्थसहाय: आदिम जमाती (कोलाम) १०० टक्के अनुदान, लक्षांक ५०. अदिवासी महिलांना ८५ टक्के अनुदान, लक्षांक ५० आहे. शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक मोटरपंप,पाईप व अनुषंगिक साहित्य: आदिम जमाती (कोलाम) १०० टक्के अनुदान लक्षांक ३० तसेच सर्वसाधारण ८५ टक्के अनुदान लक्षांक ३० आहे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह, यवतमाळ,घाटंजी,मारेगांव,राळेगांव,झरी, कळंब व वणी याठिकाणी आहे. वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी अर्ज उपलब्ध आहे यासाठी ३२५ लक्षांक आहे. २० मे पर्यंत लाभार्थ्याकडील भरलेले अर्ज स्विकारले जाणार आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावे,असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी याशनी नागराजन,यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी