नगरपरिषद, नगरपंचायतमधील अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षासूची जाहीर हरकती घेण्यास २६ मे पर्यंत मुदत

यवतमाळ, दि. २३ मे (जिमाका):- यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद , नगरपंचायत मधील गट क व गट-ड संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची १ जानेवारी २०२३ या दिनांकावर आधारित सन २०२२ या वर्षातील पात्र उमेदवारांची सुधारित सामाईक प्रारूप प्रतीक्षासूची जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सूचना फलकावर, yavatmal.nic.in या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद /नगरपंचायत कार्यालयाचे सूचना फलकावर आज २३ मे रोजी प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. सदर गट-क व गट-ड संवर्गातील अनुकंपा उमेदवारांच्या सुधारित सामाईक प्रारूप प्रतीक्षा सूचीवर ज्या अनुकंपा धारकांना काही हरकती व सूचना दाखल करावयाच्या असतील, त्यांनी संबंधित नगरपरिषद /नगरपंचायत यांच्या मुख्याधिकारी यांचेकडेच संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत कार्यालय येथे २४ मे (बुधवार) ते दिनांक २६ मे २०२३ (शुक्रवार) या कालावधित कार्यालयीन वेळेत पुराव्यासहीत लेखी स्वरुपात सादर कराव्यात. त्यानंतर येणाऱ्या हरकती व सूचना विचारात घेण्यात येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे लेखी हरकती व सूचना संबंधित नगरपरिषद /नगरपंचायत यांच्या मुख्याधिकारी यांचेकडेच नगरपरिषद/ नगरपंचायत कार्यालय येथे प्राप्त होतील, त्यावर २९ मे २०२३ (सोमवार) रोजी सकाळी ११ वाजता पासून जिल्हा सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ हे सुनावणी देतील, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी