घाटंजी येथे २३ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

यवतमाळ, दि १६ मे (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घाटंजी यांचे संयुक्त विद्यमाने २३ मे सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घाटंजी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्याकरीता एकूण ९०५ रिक्तपदे विविध नामांकित कंपन्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक,यवतमाळ, भुमी विकास इन्डस्ट्रीज, पुसद, आरोही इन्फो एफ आय मॅनेजमेंट लि. अकोला संभाजी नगर, वैभव एन्टर प्रायजेस, नागपूर, टॅलेनसेतू सर्व्हिसेस प्रा.लि. पुणे, नवभारत फर्टिलायझर, अमरावती, धुत ट्रान्समिशन, औरगाबाद, परमस्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. औरंगाबाद/ पूणे, नवकिसान बायोप्लँटेक लि. नागपूर, मेगाफिड बायोटेक, नागपूर यांच्याकडुन उपलब्ध झालेली आहे. सदर मेळाव्यामध्ये इयत्ता १०वी, १२ वी, आय.टि.आय पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन या संधीचा लाभ घेता येणार आहे. सदर मेळाव्यास उद्योजकांकडून उमेदवारांशी प्रत्यक्ष थेट मुलाखतीव्दारे रिक्तपदांकरीता निवड करण्यात येणार आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवावा , असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यवतमाळ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी