आजपासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, ग्रंथोत्सव
यवतमाळ, दि. 30 : जिल्हातरीय विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथोत्सव मंगळवार, दि. 31 जानेवारी आणि बुधवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. येथील अभ्यंकर कन्या शाळेत होणाऱ्या प्रदर्शनामध्ये तालुक्यातून निवड झालेल्या विद्यार्थी, शिक्षण प्रयोगशाळा परिचर यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले आहे.
00000

राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली
      यवतमाळ दि. 30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा दिन पाळण्यात येतो. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात राष्ट्रपित्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते उपस्थित होते. कार्यक्रमात दोन मिनीटांचे मौन पाळण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महिलांनी भजन सादर केले.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी