81 पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डात 128 जण भरती


यवतमाळ, दि.4 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 81 ॲक्टीव्ह पॉझेटिव्हसह एकूण 128 जण भरती आहेत. यापैकी 47 प्रिझमटिव्ह केसेस असून गत 24 तासात चार जण भरती झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.
तसेच गत 24 तासात एकूण 42 रिपोर्ट महाविद्यालयाला प्राप्त झाले. यापैकी 37 निगेटिव्ह, एक पॉझेटिव्ह तर 14 दिवसांच्या कालावधीनंतर चार जणांचे नमुने पुन्हा पॉझेटिव्ह आले आहेत. त्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 81 आहे. आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता 1200 नमुने पाठविले. यापैकी 1197 प्राप्त तर तीन अप्राप्त आहेत. प्राप्त झालेल्या नमुन्यांपैकी आतापर्यंत 1106 नमुने निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 109 जण आणि गृह विलगीकरणात 1117 जण आहेत.
लॉकडाऊनच्या तिस-या टप्प्याला सुरवात झाली आहे. यवतमाळ नगर पालिका वगळता इतर पालिका क्षेत्रात आणि ग्रामीण भागात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. शासन आणि प्रशासनाच्या सुचनेप्रमाणे नागरिकांनी बाहेर पडतांना मास्कचा वापर करावा. अनावश्यक गर्दी टाळावी. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे. लॉकडाऊनच्या या महत्वाच्या टप्प्यातसुध्दा नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी