ऑटोमोबाईल व वाहन सर्व्हिसिंगची दुकाने सकाळी 8 ते 12 पर्यंत सूरू


यवतमाळ, दि. 8 : राज्यात लॉकडाऊनची मुदत दिनांक 17 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. शहरातील ऑटोमोबाईल, वाहन सर्व्हिसिंग मालकांनी जिल्हाधिका-यांकडे केलेल्या निवेदनानुसार जिल्ह्यातील ऑटोमोबाईल्सची दुकाने, वर्कशॉप / वाहन सर्व्हिसिंग सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपावेतो खालील अटीच्या अधीन राहून सुरु ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या आदेशान्वये देण्यात आली आहे.
मालकांनी कमीत कमी कामगारांसह वर्कशॉप व सर्व्हिसिंग सेंटर सुरु ठेवावी. सर्व कामगारांनी मास्कचा वापर करावा. वर्कशॉप व सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करतांना आपसामध्ये व ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर ठेवावे. तसेच कामाच्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करावा. वर्कशॉप व सर्व्हिंसिंग सेंटरमधील कोणालाही करोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यास त्याबाबत तातडीने महसूल / आरोग्य विभागास कळवून स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची जबाबदारी मालकाची राहील.
वर्कशॉप किंवा सर्व्हिसिंग सेंटर नियमित निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करावी. वरील आदेशांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री मालकांनी करावी. तसेच कामाच्या ठिकाणी कामगारांना / कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणी जाणे व येण्याकरीता मालकांनी इन्सिडंट कमांडर यांच्याकडून पासेस प्राप्त करून घेण्यात द्याव्यात. वरील कामाच्या ठिकाणी मालकांनी दिलेले निर्देश न पाळल्यास व कोरोना विषाणूंचा सामाजिक स्तरावर फैलाव झाल्यास संपूर्णत: जबाबदारी मालकांची राहील. सदर आदेश दिनांक 17 मे 2020 पावेतो वैद्य राहील. हा आदेश यवतमाळ जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राकरीता लागू होणार नाही.
वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
००००००
वृत्त क्र. 377
आता 20 लोकांमध्ये आटोपता येईल लग्न
यवतमाळ, दि.8 : लॉकडाऊन परिस्थितीत आता जिल्ह्यात लग्न समारंभाला मुभा देण्यात आली आहे. मात्र लग्न समारंभास 20 पेक्षा जास्त पाहूणे मंडळी उपस्थित राहणार नाही व सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. तसेच पाहुणे मंडळीनी मास्क लावणे बंधनकारक राहील. लग्न समारंभ सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीत पार पाडणे बंधनकारक राहील. यवतमाळ जिल्ह्‌यातील प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये लग्न समारंभ आयोजित करता येणार नाही. हे आदेश दिनांक 17 मे 2020 पावेतो लागू राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशान्वये कळविण्यात आले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी