आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह तर एकाला सुट्टी


v जिल्ह्यात 16 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण

यवतमाळ, दि.22 : गत काही दिवसापासून संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती असलेल्या दोन जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहेत. हे दोन्ही रुग्ण यवतमाळ शहरातील इंदिरा नगर येथील असून ते इंदिरा नगरातील पॉझेटिव्ह रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील आहेत. त्यांना आता आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यामुळे कालच्या (दि.21) रुग्णसंख्येत दोन ने वाढ होऊन ही संख्या 17 वर गेली होती. मात्र 14 दिवसाच्या उपचारानंतर पॉझेटिव्ह असलेला एक रुग्ण पूर्ण बरा झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली. त्यामुळे एक्टिव पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16 आहे.

आयसोलेशन वॉर्डमध्ये सध्यास्थितीत 22 जण भरती असून यापैकी सहा केसेस प्रिझमटिव्ह आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 112 झाली असून यापैकी 96 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 25 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 1887 नमुने पाठविण्यात आले असून यापैकी 1862 नमुने प्राप्त तर 25 नमुने अप्राप्त आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 1750 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 16 जण तर गृह विलगीकरणात 484 जण आहेत.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी