पुन्हा एका पॉझेटिव्ह रुग्णाची भर, संख्या 25 वर



v आयसोलेशन वॉर्डात 30 जण भरती

यवतमाळ, दि. 29 : उमरखेड येथे मुंबईवरून आलेली महिला पॉजिटिव्ह आल्याने कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत एकने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एक्टिव पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 25 झाली असून आयसोलेशन वॉर्डात 30 जण भरती आहेत. यात पाच केसेस प्रिझमटिव्ह आहेत.

नव्याने पॉजिटिव्ह आलेली ही महिला संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती होती. तिला गुरुवारी रात्री वैद्यकिय रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. तसेच तिच्या कुटुंबातील 19 सदस्य संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती होते. आता त्यांना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

गत 24 तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 37 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 11 पॉझेटिव्ह, 25 निगेटिव्ह तर एकाचा रिपोर्ट अचूक नसल्याने तपासणीकरीता तो पुन्हा पाठविण्यात येईल. सुरवातीपासून आतापर्यंत 2042 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. यापैकी 2038 रिपोर्ट प्राप्त तर चार रिपोर्ट अप्राप्त आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 124 झाली आहे. यापैकी तब्बल 99 जण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 1914 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे. संस्थात्मक विलगीकरणात 12 जण आणि गृह विलगीकरणात 524 जण आहे.

काल (दि.28) दिग्रस येथील पॉझेटिव्ह आलेल्या नागरिकांनी कुटुंबासह पार्टी केल्याचे निष्पण्ण झाले आहे. हे नागरिक मुंबईवरून जिल्ह्यात आले होते. त्यांच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारण्यात आला होता. जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, आरोग्य विभाग व संपूर्ण यंत्रणा जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहे. तरीसुध्दा दिग्रस येथे आलेल्या नागरिकांनी निष्काळजीपणा केला. त्यामुळे मुंबई, पुणे किंवा इतर रेड झोनमधून जिल्ह्यात आलेल्या लोकांनी पुढील 14 दिवस स्थानिक लोकांच्या संपर्कात येऊ नये. त्यांनी स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी अत्यंत जबाबदारीने आणि सक्तीने गृह विलागिकरणातच राहावे.

सर्व नागरिकांनी आपल्या घरातील 65 वर्षाच्या वरील व्यक्ति आणि 10 वर्षाखालील मुलांची काळजी घ्यावी. सर्वांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत जिल्ह्यात कुठेही फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या सूचनांचे सर्वांनी पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी