आयसोलेशन वॉर्डात सात पॉझेटिव्हसह 16 जण भरती


v कोरोनाबाधित रुग्णवाढीच्या संख्येला ब्रेक

यवतमाळ, दि.17 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये सद्यस्थितीत सात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 16 जण भरती आहेत. यात नऊ केसेस प्रिझमटिव्ह असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता 20 नमुने पाठविले आहे. तर कालपासून महाविद्यालयाला 11 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. यात आठ रिपोर्ट निगेटिव्ह असून तीन रिपोर्टचे अचुक निदान नसल्यामुळे त्यांना तपासणीकरीता पुन्हा पाठविण्यात येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 1668 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. संस्थात्मक विलगीकरणात 12 जण तर गृह विलगीकरणात 846 जण आहेत.

गत पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नाही. शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकूण 98 पैकी तब्बल 91 जण बरे होऊन घरी गेले आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे व आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमामुळे गत दोन महिन्यात एकाही कोरोनाबाधित व्यक्तिचा जिल्ह्यात मृत्यु झाला नाही. ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी