नेर व धानोरा येथील प्रतिबंधीत क्षेत्राच्या 3 किमी परिघीय सीमा बंद

यवतमाळ, दि.11 : जिल्ह्यातील नेर शहरात आणि उमरखेड तालुक्यातील धानोरा येथे नागरिकांचे अहवाल पॉझेटिव्ह आल्यामुळे हे दोन्ही ठिकाण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच या विषाणुचा प्रादुर्भाव इतरांना होऊ नये म्हणून नेर आणि धानोरा येथील प्रतिबंधित क्षेत्राच्या तीन किमी परिघीय सीमा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहे.
दिल्ली येथील आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोव्हिड – 19 बाबत प्रतिबंधित प्लान निर्धारीत केला असून त्यानुसार कोरोना विषाणूद्वारे बाधित व्यक्ती / समुदायाच्या केंद्रबिंदू पासून 3 किलोमीटरच्या परिसरापर्यंत नागरिकांची हालचाल / फिरणे / संपर्क यावर निर्बंध घालून मज्जाव करण्याबाबत निर्देशित केले आहे.
त्यानुसार नेर आणि धानोरा येथील प्रतिबंधित क्षेत्राच्या 3 किमी परिघीय सीमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश देण्यात येत आहे. यात नेर येथील प्रोफेसर कॉलनी, वलीसाहब दर्गा परिसर, अहेबाब नगर, वलीसाहब नगर, वडरपूरा, मातामाय मंदीर परिसर, मुबारक नगर, नगर परिषद शाळा क्रमांक 6, खासाहेब प्लॉट, नगरपरिषद शाळा क्र.7, नई नगरी सावला प्लॉट, मारवाडी चौक आणि पठाणपूरा येथील मदरसाच्या लगतची घरे यांचा समावेश आहे. तर उमरखेड तालुक्यातील धानोरा या गावास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून या गावाच्यासुध्दा तीन किमी परिघीय क्षेत्राच्या सीमा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
वरील दोन्ही ठिकाणी या आदेशाचे कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी / कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेस्तव कर्तव्य करण्याची मुभा राहील. तसेच मुख्याधिकारी, नगर‍ परिषद, नेर यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना/ पासेस निर्गमित कराव्या. तसेच त्यांची यादी पोलीस स्टेशनला द्यावी. वरील आदेशांचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल