यवतमाळ आणि नेर शहरात आरोग्याबाबत होणार सर्वे

                         
                       
v आरोग्य पथके घरोघरी, कोव्हिड-19 बाबतही जनजागृती
v सर्वांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
यवतमाळ, दि.9 : जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण यवतमाळ आणि नेर शहरातील आहे. आरोग्याच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी यवतमाळ आणि नेर या शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता संपूर्ण शहराचा सर्व्हे करण्यात येणार आहे. यात आरोग्य पथके शहरातील घरोघरी जाऊन सर्व्हे करतील. तसेच कोव्हिड-19 बाबत माहिती देऊन जनजागृती करणार आहेत. घरी येणा-या पथकाला नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
जिल्हाधिका-यांच्या संकल्पनेतून  कम्युनिटी सोशल मेडीसीन अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण यांच्या सहकार्याने हा सर्व्हे होणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच नगर पालिका प्रशासनाने 12 ते 15 मे या चार दिवसात यवतमाळ शहरात सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एकूण 210 अधिकारी - कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ शहरातील सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर नेर शहरात आरोग्य पथकाकडून सर्व्हे करण्यात येईल, असे प्रशासनाने कळविले आहे.
शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर प्रभागात हा सर्वे करण्यात येणार असून त्या अनुषंगाने सदर पथके चार दिवस शहरात घरोघरी फिरणार आहेत. तपासणी करणा-या पथकातील अधिकारी व कर्मचा-यांनी त्यांना नेमुन दिलेल्या दिवशी व नेमुन दिलेल्या प्रभागात वेळेत सर्वेक्षण पूर्ण करावे व जिल्हास्तरीय समितीला अहवाल सादर करावा, अशा सुचना प्रशासनाने दिल्या आहे.
कर्मचा-यांच्या सर्वेक्षणाबाबतचे प्रशिक्षण जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 11 मे रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे. 
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी