अडकलेल्या यवतमाळकरांसाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार

       
       
v मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गुजरातचे वनमंत्र्यांसोबत चर्चा
यवतमाळ, दि.5 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन व संचारबंदीमुळे विविध ठिकाणी अडकलेले नागरिक, विद्यार्थी, मजूर, कामगार आदींना त्यांच्या गृह राज्यात / जिल्ह्यात जाण्याची परवानगी अटी आणि शर्तीसह देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक जण बाहेर जिल्ह्यात तसेच राज्यात अडकून आहेत. या सर्वांना स्वगृही आणण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पुढकार घेतला आहे.
या अनुषंगाने श्री. राठोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मुंबई आणि पुण्यात यवतमाळ जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी तसेच नागरिक अडकून पडले आहेत. तसेच येण्यासंदर्भात काही अडचणी आहेत, असे पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना सांगितले. तसेच गुजरातमध्ये अडकून पडलेल्या यवतमाळकरांसाठी श्री. राठोड यांनी गुजरातचे वनमंत्री गणपतीभाई वसावा यांच्याशी फोनवर बोलणे केले. गुजरातमध्ये अडकलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांची तपासणी करून त्यांना जाण्याची परवानगी देणार असल्याचे सुरतच्या जिल्हाधिका-यांनी पालकमंत्री श्री. राठोड यांना सांगितले.
याशिवाय पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासुध्दा पालकमंत्री बोलले. पुणे, मुंबई व इतर शहरात अडकलेल्या यवतमाळच्या नागरिकांनी राज्याच्या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावा. त्यांची तपासणी करून त्यांना यवतमाळ जिल्ह्यात घेण्यासाठी येथील प्रशासन तयार आहे, असेही पालमंत्र्यांनी सांगितले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी